भारतावर 100% टॅरिफ लावणारे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर
भारतावर 100% टॅरिफ लावणारे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर
नवी दिल्ली-: अमेरिका आता रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर एक समान 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. अमेरिकन सिनेटने 86-11 च्या बहुमताने भारतासह 5 देशांवर 100% पर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचे विधेयक मंजूर केले आहे.विधेयकानुसार भारत, चीन, स्लोवाकिया, हंगेरी आणि अझरबैजानवर 100% शुल्क (टॅरिफ) लावले जाऊ शकते. हे विधेयक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्याने आणले गेले. याचा उद्देश रशियाच्या तेलातून मिळणारे उत्पन्न कमी करणे हा आहे, जेणेकरून त्याची युद्ध लढण्याची क्षमता कमकुवत होईल. 23 जुलै रोजी रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर 100% पर्यंत शुल्क (टॅरिफ) लावण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.
भारताने जून 2026 मध्ये रशियाकडून विक्रमी 26.1 लाख बॅरल प्रतिदिन कच्चे तेल खरेदी केले, जे देशाच्या एकूण तेल आयातीच्या 52.4% होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातूनच भारतावरील टॅरिफकरिता विरोध केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा विरोध वाढताना दिसतोय. सिनेटरकडून यावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलीत. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. त्यात 100 टक्के टॅरिफमधून कोणतीही सुटका मिळणार नाही.
हा विधेयक आणताना हा तर्क लावण्यात आला की, या तेल खरेदीमुळे युक्रेन विरोधातील युद्धाला खतपाणी मिळतंय. भारत, चीन, अजरबॅजान, हंगरी, स्लोवाकिया हे देश रशियाकडून तेल खरेदी करणारे मुख्य खरेदीदार आहेत. मतदानानंतर सीनेटर ब्लूमॅंथल यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले की, हे कठोर निर्बंध आणि आयात शुल्क या जीवघेण्या, गुन्हेगारी स्वरूपाच्या आणि आक्रमक युद्धात सहभागी असलेल्या सर्वांनाच रोखतील.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant